अ‍ॅपशहर

धरणपातळी वाढेना!

लहान-मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दणकेबाज पाऊस नसल्याने कोकण वगळता सर्व ठिकाणच्या धरणांचा जलसाठा जैसे थे आहे.

Maharashtra Times 1 Jul 2016, 7:12 am
मुंबई ः मुंबईसह कोकणात गेले काही दिवस बस्तान मांडणाऱ्या पावसाने काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता गेल्या २४ तासांत राज्यात सर्वत्र हजेरी लावली आहे. बहुतांश भागात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. तथापि, राज्यातील लहान-मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दणकेबाज पाऊस नसल्याने कोकण वगळता सर्व ठिकाणच्या धरणांचा जलसाठा जैसे थे आहे. सध्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा सरासरी ९ टक्क्यांच्या घरात असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no rise in water level in mumbai dams
धरणपातळी वाढेना!


​मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, विदर्भातील यवतमाळ आणि विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. कोकणात पावसाने मुक्काम ठोकला असून, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या तुलनेत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस झाला. तथापि, खान्देशातील नंदुरबार, धुळे, उत्तर महाराष्ट्रातील ना​शिक, अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्राती​ल पुणे, सोलापूर, सांगली, मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये केवळ शिडकावा झाला झाला.

तलावांकडे पावसाची पाठ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात मात्र पाठ फिरवली आहे. सर्व सात तलावांमध्ये मिळून फक्त ५४८.९० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तलावांमध्ये सध्या सुमारे एक लाख दशलक्ष लिटर इतका म्हणजे मुंबईच्या दीड कोटी लोकसंख्येसाठी एक महिना पुरेसा इतका साठा आहे. विदर्भामध्ये जूनच्या सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस आहे तर मध्य महाराष्ट्रात तब्बल ३० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज