अ‍ॅपशहर

भाजप, सेनेला पाठिंबा नाहीच

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी प्रसारमाध्यमांतून उठत असलेल्या वावड्यांचे खंडन केले.

Maharashtra Times 26 Feb 2017, 2:38 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no support to shivsena bjp
भाजप, सेनेला पाठिंबा नाहीच


मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक शनिवारी मुंबई प्रदेश कार्यालयात बोलाविली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या पाठिंब्याबाबत विविध प्रसारमाध्यमांतून उठत असलेल्या वावड्यांचे खंडन केले.

काँग्रेस हा सेक्युलर विचारधारेचा पक्ष असून आपण भाजप व शिवसेना कुणाचेही समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी नगरसेवकांना सांगितले. तसेच इतर कुठल्याही पक्षाकडून काही वावड्या वा आमिष दाखविले जात असेल तर त्यापासून जपून राहा, असेही निरुपम यांनी सांगितले. पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करतानाच पालिकेच्या माध्यमातून सातत्याने संघर्षशील राहण्याबाबतही निरुपम यांनी नगरसेवकांना सांगितले. तसेच पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो तुम्हाला सांगण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेला पाठिंबा नको : कामत

दरम्यान, काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी पक्षाने शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देता कामा नये, असे म्हटले आहे. पक्षाला जो जनादेश मिळाला आहे, त्यानुसार पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी. तसेच या दोन्ही पक्षांना जे करायचे आहे ते करू द्यावे. त्या भानगडीत पक्षाने पडू नये, असे कामत यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही कळविले असल्याचे कामत यांनी सांगितल्याचे समजते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज