अ‍ॅपशहर

अर्धवेळ शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन लागू

अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड.आशिष शेलार यांनी आज घोषित केले. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Aug 2019, 6:55 pm
मुंबईः अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड.आशिष शेलार यांनी आज घोषित केले. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teachers


राज्यातील अशासकीय खाजगी शाळांतील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तसेच अनुदानित व महापालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, अशासकीय खाजगी शाळातिल अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथपाल व रात्र शाळेचे शिक्षकांचा निर्णय प्रलंबित होता.

राज्यात १०१२ अर्धवेळ शिक्षक, १४३१ अर्धवेळ ग्रंथपाल तसेच १६५ रात्र शाळांमधे काम करणारे ६३० रात्र शाळा शिक्षक, २१९ शिक्षकेत्तर कर्मचारी असून, या सर्वांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करणारा शासन मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी घेतला असून, त्याचा निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज