अ‍ॅपशहर

UT वाईट... 'वर्षा' बंगल्याच्या भिंतीही राजकारणात रंगल्या!

'भिंतीलाही कान असतात...' अशी एक म्हण आहे. त्यामुळं एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चार भिंतीच्या आत बोलतानाही काळजी घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रातील द्वेषाचं राजकारण इतकं टोकाला गेलं आहे की त्यासाठी आता थेट भिंतींचाच आधार घेतला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वर्षा बंगल्याच्या भिंतीवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह लिखाणावरून हेच दिसून आलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Dec 2019, 8:08 pm
मुंबई: 'भिंतीलाही कान असतात...' अशी एक म्हण आहे. त्यामुळं एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चार भिंतीच्या आत बोलतानाही काळजी घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रातील द्वेषाचं राजकारण इतकं टोकाला गेलं आहे की त्यासाठी आता थेट भिंतींचाच आधार घेतला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वर्षा बंगल्याच्या भिंतीवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह लिखाणावरून हेच दिसून आलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Varsha Bungalow


वाचा: शिंदे, थोरातांची पळापळ; बंगल्यांची आदलाबदल

राज्यातील सत्ता बदलानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह वर्षा बंगला सोडला. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप तिथं राहायला गेलेले नाहीत. मात्र, त्याआधीच वर्षा बंगल्यातील रंगलेल्या भिंतींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून राजकारणही रंगलं आहे. या भिंतींवर देवेंद्र फडणवीस रॉक्स... यूटी इज मीन (यूटी वाईट आहेत), भाजप, भाजप असंही लिहिण्यात आलं आहे. 'यूटी' म्हणजे नेमकं कोण?; यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाचं इंग्रजीतील संक्षिप्त रूप 'यूटी' असं होतं. त्यामुळं हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा आहे. मात्र, ते नेमकं कोणी लिहिलं? हे व्हिडिओ चित्रण कुणी केलं आणि ते कसं व्हायरल झालं, याबाबत काहीही कळू शकलेलं नाही.

फडणवीसांचं स्पष्टीकरण

बंगल्यातील भिंतीवर हे सगळं देवेंद्र फडणवीसांची मुलगी दिविजानं लिहिलं असल्याची चर्चा होती. मात्र, फडणवीस यांनी यात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. 'साधारण १५ दिवसांपूर्वीच आम्ही बंगला सोडला. त्यावेळी कोपरा न् कोपरा पाहिला होता. तेव्हा असं काहीही लिहिलेलं आढळलं नव्हतं. दिविजानं तर असं काही लिहिण्याचा प्रश्नच नाही. यावरून होणारं राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. आमची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

वाचा: मिसेस फडणवीसामुळं अॅक्सिस बँकेला असा फटका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज