अ‍ॅपशहर

इमारतीचा भाग कोसळून १ मृत्युमुखी

दादरमधील हिंदू कॉलनीत एका जुन्या इमारतीचे पाडकाम सुरू असताना अचानक काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत खांब पडल्याने एका 'ओला' टॅक्सी चालकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली एक गाडी तसेच काही जण दबले असल्याची प्राथमिक माहितीही मिळत आहे. तातडीने घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाने बचाव व मदतकार्य सुरू केले आहे.

Maharashtra Times 15 Feb 2017, 7:12 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम old building collapse in dadar mumbai several trapped
इमारतीचा भाग कोसळून १ मृत्युमुखी

दादरमधील हिंदू कॉलनीत एका जुन्या इमारतीचे पाडकाम सुरू असताना अचानक काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत खांब पडल्याने एका 'ओला' टॅक्सी चालकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली एक गाडी तसेच काही जण दबले असल्याची प्राथमिक माहितीही मिळत आहे. तातडीने घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाने बचाव व मदतकार्य सुरू केले आहे.

दादर पूर्वेकडील हिंदू कॉलनीतील गल्ली नंबर दोनमध्ये ही दुर्घटना घडली. येथील गोविंद मंगेश लाड मार्गावर असलेली तेजल ही तीन मजली जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू असतानाच काही भाग कोसळल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली काही जण दबले असल्याची भीती असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज