अ‍ॅपशहर

सिलिंडरस्फोटात फुगेवाल्याचा मृत्यू

भांडुपच्या जंगलमंगल रोडवर फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन शनिवारी फुगेवाल्याचा मृत्यू झाला. नादीर पठाण (२४) असे त्याचे नाव असून, या दुर्घटनेत अन्य एक जखमी झाल्याचे समजते. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, सिलिंडर ३०० मीटरवर जाऊन पडला व जवळपासच्या इमारतीच्या खिडकीच्या काचाही फुटल्या.

Maharashtra Times 13 Aug 2017, 4:00 am
मुंबई : भांडुपच्या जंगलमंगल रोडवर फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन शनिवारी फुगेवाल्याचा मृत्यू झाला. नादीर पठाण (२४) असे त्याचे नाव असून, या दुर्घटनेत अन्य एक जखमी झाल्याचे समजते. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, सिलिंडर ३०० मीटरवर जाऊन पडला व जवळपासच्या इमारतीच्या खिडकीच्या काचाही फुटल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one dead in cylinder blast
सिलिंडरस्फोटात फुगेवाल्याचा मृत्यू


फुग्यांमध्ये गॅस भरताना सकाळी हा स्फोट झाला. यामुळे शेजारी उभ्या असलेल्या गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलिस तपासात नादीरच्या झोपडीत आणखी काही सिलिंडर सापडले आहेत. सुदैवाने ते फुटले नाहीत, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. याप्रकणी भांडुप पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून, चंगे अब्दुल खान, धर्मेंद्र हरियन यांना अटक केली आहे. त्यांनी नादीरला बेकायदा सिलिंडर पुरवल्याचा संशय असल्याचे पोलिस उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज