अ‍ॅपशहर

मुंबईत घराचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, चार जखमी

चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत घराचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2020, 11:46 pm
मुंबईः चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत घराचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mumbai house collapsed



चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीतील वत्सलाताई नाईक नगरमधील गल्ली क्रमांक सहा येथे चंद्रभागा क्षीरसागर यांच्या घरात बांधकाम सुरू होते. दुसऱ्या मजल्याचे काम सुरू असतानाच त्याचे छत कोसळल्याने क्षीरसागर यांचे नातेवाईक असलेले प्रभू खंदारे (६०) हे जबर जखमी झाले व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अयूब शेख (४५) हा कंत्राटदार गंभीर जखमी झाला. तर संजय भोसले, गौतम गायकवाड, शाहरुख शेख, रतनलाल शिंगाडे हे कामगार आणि क्षीरसागर यांचा नातू आरव (१२) हे किरकोळ जखमी झाले.


या घरात पोटमाळ्याचं काम सुरू असतानाच हा अपघात घडला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसंच, मलबा काढण्यात येत आहे. तसंच, बचाव कार्य सुरू असून जखमींना राजावडी रुग्णालयात दाखल केलं आहे तर गंभीर रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज