अ‍ॅपशहर

रायनच्या मुंबईतल्या शाळेत पालकांची निदर्शने

रायन इंटरनॅशनल स्कूलच्या नवी मुंबईतील सानपाडा येथील शाळेच्या बाहेर पालकांनी आज निदर्शने केली. मुलांच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी पालक शाळेच्या आवारात एकत्र आले होते. दरम्यान, रायन इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ रायन पिंटो यांची अटक बुधवारपर्यंत टळली आहे. पिंटो यांनी सोमवारी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावरील सुनावणी बुधवारी होणार आहे.

Maharashtra Times 12 Sep 2017, 4:15 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parents protest at ryan international school in sanpada navi mumbai questioning the safety of students
रायनच्या मुंबईतल्या शाळेत पालकांची निदर्शने

रायन इंटरनॅशनल स्कूलच्या नवी मुंबईतील सानपाडा येथील शाळेच्या बाहेर पालकांनी आज निदर्शने केली. मुलांच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी पालक शाळेच्या आवारात एकत्र आले होते. दरम्यान, रायन इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ रायन पिंटो यांची अटक बुधवारपर्यंत टळली आहे. पिंटो यांनी सोमवारी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावरील सुनावणी बुधवारी होणार आहे.

गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेचा दुसरीतला विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर याची ८ सप्टेंबरला शाळेच्या शौचालयात गळा चिरून हत्या झाली. याप्रकरणी शाळेच्या बस कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. त्याने आपला गुन्हाही कबूल केला आहे. पण प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत शाळांचा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे.

रायन इंटरनॅशनलच्या देशातील १८ राज्यात आणि परदेशात मिळून एकूण १३५ शाळा आहेत. या शाळांमधून ३ लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. एकूण सुमारे १५ हजार शिक्षक या शाळांत शिकवतात. मु्ंबईत कांदिवली, गोरेगाव,

रायन इंटरनॅशनलचे संस्थापक ऑगस्टिन पिंटो, सीईओ रायन पिंटो, व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती त्यांचे वकिल नितीन प्रधान यांनी दिली. या अर्जांवर आज सुनावणी होणार होती, मात्र ती बुधवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, ग्रेस पिंटो यांची आज मुंबईत हरयाणा पोलिसांनी चौकशी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज