अ‍ॅपशहर

पार्ले महोत्सवाची यशस्वी सांगता

कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांप्रमाणेच विविध उपक्रम राबवणाऱ्या १७ व्या पार्ले महोत्सवाची बुधवारी यशस्वी सांगता झाली झाला. महोत्स्वातील स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यातून सुमारे ६० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला.

Maharashtra Times 1 Dec 2016, 4:00 am
६० हजार स्पर्धकांनी लावली उपस्थिती!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parle mahotsav ends
पार्ले महोत्सवाची यशस्वी सांगता

म. टा. प्रतिनिधी, मुंबई
कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांप्रमाणेच विविध उपक्रम राबवणाऱ्या १७ व्या पार्ले महोत्सवाची बुधवारी यशस्वी सांगता झाली झाला. महोत्स्वातील स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यातून सुमारे ६० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. या महोत्सवात चिमुरड्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
पार्ले महोत्सवातील कला, सांस्कृतिक विभागातील नृत्य, समूह नृत्य, शॉर्ट फिल्म्स, चित्रकला, हस्ताक्षर, मेंदी आदी स्पर्धाही लक्षणीय ठरल्या. त्यात, राज्यातील अनेक भागांपासून ते सुरत, नवसारी, वापी, बेंगळुरू आदी भागांतूनही स्पर्धक सहभागी झाले होते. महोत्सवात कबड्डी, व्हॉलीबॉल, मल्लखांब, शरीरसौष्ठव, ५० मीटर धावणे आदी स्पर्धांना कमालीचा प्रतिसाद ​लाभला. यंदाच्या कबड्डी स्पर्धेत २९४ संघांनी विक्रमी सहभाग घेतला.
यावेळी, स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आमची खरी ताकद असून त्यामुळेच महोत्सव अधिकाधिक उत्तमतेकडे नेण्याची प्रेरणा मिळत असल्याचे उद्गगार प्रमुख आयोजक आणि आमदार पराग अळवणी यांनी समारोपप्रसंगी काढले.
पाच वर्षांपासून ते ७५ वर्षीय ज्येष्ठांनी या महोत्सवात घेतलेला सहभाग वैशिष्ट्यपूर्ण ठरला. तर, महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या होम मिनि​स्टर स्पर्धेसह सर्वच स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असल्याचे नगरसेविका ज्योती अळवणी यांनी आवर्जून सांगितले.
यावर्षी नृत्य स्पर्धेस प्रौढांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षापासून ४५ वर्षांवरील स्पर्धकांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे आयोजन समितीचे अध्यक्ष गुरुचरणसिंग संधू यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी महोत्सवात स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात आली. करुया भारत स्वच्छ, स्वच्छ कारभार या ब्रीद वाक्यासह अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील या विषयासंदर्भात जनजागृतीत सहभाग घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज