अ‍ॅपशहर

उद्योजकतेसाठी मार्गदर्शन

केंद्र सरकारने स्टार्ट अप, स्टँड अप, मेक इन इंडिया आणि स्किल इंडियासारखे अनेक उपक्रम जाहीर केले आहेत. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि विशेषतः उद्योजक होण्याकरिता योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणेची गरज आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पार्ले टिळक विद्यालय असोशिएशन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट पुढे सरसावले आहे.

Maharashtra Times 18 Jan 2017, 4:01 am
पार्ले टिळक विद्यालय असोशिएशन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटतर्फे परिषद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parle tilak school association entrepreneurship development
उद्योजकतेसाठी मार्गदर्शन


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

केंद्र सरकारने स्टार्ट अप, स्टँड अप, मेक इन इंडिया आणि स्किल इंडियासारखे अनेक उपक्रम जाहीर केले आहेत. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि विशेषतः उद्योजक होण्याकरिता योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणेची गरज आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पार्ले टिळक विद्यालय असोशिएशन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट पुढे सरसावले असून इन्स्टिट्युटतर्फे येत्या २१ जानेवारी रोजी विशेष एकदिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत.

‘बी ए जॉब क्रीएटर…नॉट ए जॉब सीकर…’ हा संदेश देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विलेपार्ले येथील चित्रकार केतकर मार्गावरील इन्स्टिट्युटच्या सभागृहात ही परिषद होणार आहे. यात आर्टस, सायन्स, कॉमर्स, इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजचे विद्यार्थी भाग घेणार आहेत. या परिसंवादात वरिष्ठ व्यावसायिक सल्लागार, वित्तीय संस्थांचे उच्चपदस्थ आणि यशस्वी स्टार्ट अप्स संवाद साधणार आहेत. या एकदिवसीय परिषदेत उद्योग उभारताना येणाऱ्या आव्हानांना सामोरे कसे जावे व भांडवल कसे उभारावे याबाबत तीन चर्चा सत्रांत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्योजक दीपक घैसास, मोहन टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेची आखणी करण्यात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज