अ‍ॅपशहर

Parth Pawar: पार्थ पवार नाराज नाहीत, आजोबांना बोलण्याचा अधिकारः जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना सुनावल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं होतं. तसंच आजोबांनी फटकारल्यानंतर नातू पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मात्र, पार्थ नाराज असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2020, 10:34 pm
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना सुनावल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं होतं. तसंच आजोबांनी फटकारल्यानंतर नातू पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पार्थ पवार नाराज असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parth pawar


'पार्थ पवार आणि त्यांचे अजित पवार नाराज नाहीत. शरद पवार हे आजोबा आहेत. आजोबांना बोलण्याचा अधिकार आहे. कुटुंबातील कोणी वडिलधारी व्यक्ती काही बोलली तर आपण नाराज होतो का?,' असा प्रश्न जयंत पाटील यांनी करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर दाखल

दरम्यान, पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळं लवकरच या वादावर पडदा पडणार असल्याचं शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. तर, बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चादेखील झाली.

breaking राज्यात करोनाचे थैमान, दिवसभरात ४१३ करोनाबाधितांचा मृत्यू

काय आहे प्रकरण

गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार हे चर्चेत आहेत. राम मंदिराच्या मुद्द्यावर जाहीर समर्थन करणारं मत पार्थ यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पार्थ पवार यांनी पक्षाशी विसंगत भूमिका मांडल्याने राष्ट्रवादीत गटतट पडले की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर अखेर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करत चर्चेला पूर्ण विराम दिला. सोबतच शरद पवार यांनी पार्थ पवारना जाहीरपणे सुनावलं. पार्थ पवार हे इमॅच्युअर असून त्यांच्या पार्थ याच्या बोलण्याचा कवडीचीही किंमत देत नाही, असं ते म्हणाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज