चिपळूण : तिवरे दुर्घटनेतील सुशीला विश्वास धाडवे या बेपत्ता महिलेचा मृतदेह सोमवारी सकाळी दादर परिसरात आढळून आल्याने आता अधिकृत मृतांची संख्या २१ झाली आहे. दीड वर्षाच्या दुर्वा चव्हाण या बालिकेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. आता एनडीआरएफने आपले शोधकार्य थांबवले असून पुनर्वसनाचे काम मात्र सुरू आहे. या दुर्घटनेतील बाधितांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यात सुसूत्रीकरणाची गरज आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. पुनर्वसनाच्या जागी जमिनीला तडे गेल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिवरेतील शोधकार्य थांबवले
तिवरे दुर्घटनेतील सुशीला विश्वास धाडवे या बेपत्ता महिलेचा मृतदेह सोमवारी सकाळी दादर परिसरात आढळून आल्याने आता अधिकृत मृतांची संख्या २१ झाली आहे...
महाराष्ट्र टाइम्स 16 Jul 2019, 4:00 am