अ‍ॅपशहर

‘आदित्य यांच्या हट्टापायी पेंग्विन’

मुंबईत धड रस्ते नाहीत, पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. त्यानंतरही आदित्य ठाकरे यांचा बालहट्ट पुरवण्यासाठी राणीबागेमध्ये पेंग्विन आणण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. आपली हौस पूर्ण करायची असल्यास ती स्वतःच्या खिशातल्या पैशांतून करावी. मुंबईकरांच्या खिशात कशाला हात घालता असा टोला मनसेने लगावला आहे.

Maharashtra Times 28 Jul 2016, 4:19 am
मुंबई ः मुंबईत धड रस्ते नाहीत, पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. त्यानंतरही आदित्य ठाकरे यांचा बालहट्ट पुरवण्यासाठी राणीबागेमध्ये पेंग्विन आणण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. आपली हौस पूर्ण करायची असल्यास ती स्वतःच्या खिशातल्या पैशांतून करावी. मुंबईकरांच्या खिशात कशाला हात घालता असा टोला मनसेने लगावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम penguines are for aditya thackerey
‘आदित्य यांच्या हट्टापायी पेंग्विन’


पेंग्विनना उणे तापमानात ठेवावे लागते. मुंबईतील उष्ण तापमान लक्षात घेता फार तर दोन वर्ष पेंग्विन मुंबईच्या वातावरणात जगू शकतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पालिकेला हे माहित असतानाही आदित्य यांचा बालहट्ट पुरवण्यासाठी पेंग्विन आणण्यात आले आहेत. ‘मोठे मोठे धंदे आणि वडापावचे वांदे,’ अशी सध्या शिवसेनेची अवस्था झाल्याची टीका मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज