अ‍ॅपशहर

प्रभारीऐवजी नियमित अधिष्ठाते

प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य रुग्णांनाही करून देण्यासाठी सरकारने येत्या वर्षांत चार महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. ते प्रत्यक्ष राबवण्यासाठी सुरुवात करण्यापूर्वी सरकारने राज्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील अतिरिक्त पदभार दिलेल्या अधिष्ठात्यांच्या जागी नियमित अधिष्ठात्यांची नेमणूक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईतील जे. जे. रुग्णालय, अंबेजोगाई, धुळे, नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयांना प्रभारी ऐवजी नियमित स्वरूपाचे अधिष्ठाता मिळणार आहेत

शर्मिला कलगुटकर | Maharashtra Times 28 Dec 2017, 4:00 am
मुंबईतील जे. जे., अंबेजोगाई, धुळे, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयांत नेमणुका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम permanent din in medical college
प्रभारीऐवजी नियमित अधिष्ठाते



मुंबई

प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य रुग्णांनाही करून देण्यासाठी सरकारने येत्या वर्षांत चार महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. ते प्रत्यक्ष राबवण्यासाठी सुरुवात करण्यापूर्वी सरकारने राज्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील अतिरिक्त पदभार दिलेल्या अधिष्ठात्यांच्या जागी नियमित अधिष्ठात्यांची नेमणूक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईतील जे. जे. रुग्णालय, अंबेजोगाई, धुळे, नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयांना प्रभारी ऐवजी नियमित स्वरूपाचे अधिष्ठाता मिळणार आहेत

येत्या तीन वर्षांत जळगावलाही वैद्यकीय क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. तेथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती केल्यानंतर शंभर जागा वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या होणार आहेत. तर नागपूर येथे सुसज्ज कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. जे. जे. रुग्णालयाचा प्रकल्प सर्वांत महत्त्वाकांक्षी असून त्यासाठी सरकारने ८८१ रुपयाचा निधी ठेवला आहे. प्रशासकीय संमती व बांधकामासाठी लागणारी संमती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नियोजन, प्रकल्पाची बांधणी व प्रशासकीय पातळीवरील सोपस्कार पार पाडण्यात रुग्णसमूहाच्या अधिष्ठात्यांची भूमिका कळीची असेल.

जे. जे. रुग्णसमूहाचा कार्यभार सक्षमपणे पार पाडणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांची पदोन्नती वैद्यकीय शिक्षण व संचनालयनाचे सहसंचालक या पदी झाल्यानंतर डॉ. एस. डी. नणंदकर यांच्याकडे जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र ते अध्ययनाचेही कार्य करत असल्याने ही जबाबदारी अतिरिक्त आहे. या प्रभारी जागीही नियमित अधिष्ठात्यांची नेमणूक लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या पाच सार्वजनिक रुग्णालयातील पूर्णवेळ, नियमित अधिष्ठात्यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते. या माहितीस वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दुजोरा दिला आहे.

जे. जे चा कायापालट

राज्यातील महत्त्वाच्या वैद्यकीय प्रकल्पांची पूर्तता करण्याचे लक्ष्य २०१८ मध्ये समोर ठेवण्यात आले आहे. जे. जे. रुग्णालयाचा कायापालट करण्यात येणार असून वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नव्या इमारतीत एकूण ११०० खाटा असून यातील दोनशे आयसीयू व एनआयसीयूसाठी राखीव असणार आहे. स्वतंत्र डायलिसिस केंद्र, तीन एमआरआय व तीन सिटी स्कॅन मशिन तसेच कॅन्सरसाठी पेट स्कॅनसह अत्याधुनिक निदान केंद्रही उभारण्यात येणार आहे. हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाची वैद्यकीय सुविधाही येथे असणार आहे.

प्रक्रिया सुरू

नियमित अधिष्ठाता पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक रुग्णालयातील कार्यकाळास गुणवत्ता, अनुभव व सेवाज्येष्ठता हे निकष अधिष्ठाता पदासाठी आहेत. जे. जे. रुग्णालय हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे सार्वजनिक रुग्णालय असल्यामुळे तेथील अधिष्ठात्यांच्या स्पर्धेत राज्यातील पाच नावे आहेत. त्यात राजकीय प्रभावाची खेळीही परिणामकारक ठरेल, अशीही चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे.
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज