अ‍ॅपशहर

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त

गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही पेट्रोल २ रुपयांनी, तर डिझेल १ रुपयाने स्वस्त करण्यात आले आहे. आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येत आहेत. यापूर्वी गुजरातमध्ये तेलावर लावण्यात आलेल्या वॅटमध्ये ४ टक्क्याची कपात करण्यात आली होती. यानंतर तिथे पेट्रोलच्या किंमतीत २.९३ रुपयांची, तर डिझेल २.७२ रुपयांची घट झाली होती.

Maharashtra Times 10 Oct 2017, 4:54 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम petrol to be cheaper by rs2 diesel by re1 across maharashtra
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त

गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही पेट्रोल २ रुपयांनी, तर डिझेल १ रुपयाने स्वस्त करण्यात आले आहे. आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येत आहेत. यापूर्वी गुजरातमध्ये तेलावर लावण्यात आलेल्या वॅटमध्ये ४ टक्क्याची कपात करण्यात आली होती. यानंतर तिथे पेट्रोलच्या किंमतीत २.९३ रुपयांची, तर डिझेल २.७२ रुपयांची घट झाली होती.

गेल्या बुधवारी केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर लावण्यात येणारी एक्साइज ड्यूटी २ रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर, सर्वसामान्य जनतेला फायदा मिळावा या उद्देशाने राज्य सरकारांनी देखील वॅटमध्ये कपात करावी असे आवाहन केंद्र सरकारने केले होते. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करण्याबाबत राज्य सरकार मंगळवारी घोषणा करू शकते असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही स्पष्ट केले होते.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोलवर २५ टक्के वॅट लावला जातो. तर, राज्यातील इतर भागांमध्ये २६ टक्के वॅट लावला जातो. या व्यतिरिक्त संपूर्ण राज्यात ११ रुपये प्रतिलीटर इतका सरचार्जही घेतला जातो. या बरोबर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत डिझेलवर २१ टक्के आणि इतर राज्यांमध्ये २२ टक्के वॅट लावला जातो. तर, संपूर्ण राज्यात डिझेलवर २ टक्के सरचार्जही लावला जातो. डिझेल आणि पेट्रोलवरील वॅटमुळे सरकारला तब्बल १९ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज