अ‍ॅपशहर

पालिकेच्या लाचखोर इंजिनीअरला अटक

घराची बेकायदा दुरुस्ती केली म्हणून पाठवण्यात आलेल्या नोटिशीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पालिकेच्या दुय्यम इंजिनीअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह अटक केली असून, किरण पाटील असे त्याचे नाव आहे. तो पालिकेच्या के पश्चिम प्रभाग कार्यालयात कार्यरत आहे.

Maharashtra Times 5 Aug 2018, 1:52 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bmc

घराची बेकायदा दुरुस्ती केली म्हणून पाठवण्यात आलेल्या नोटिशीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पालिकेच्या दुय्यम इंजिनीअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह अटक केली असून, किरण पाटील असे त्याचे नाव आहे. तो पालिकेच्या के पश्चिम प्रभाग कार्यालयात कार्यरत आहे.

अंधेरीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वत:च्या फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतले. यासाठी कोणतेही परवानगी घेतली नसल्याने पालिकेच्या वतीने त्यांना नोटीस पाठविण्यात आली. या नोटिशीवर कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी के पश्चिम कार्यालयात जाऊन किरण पाटीलची भेट घेतली. कायदेशीर कारवाई थांबविण्यासाठी पाटीलने या व्यक्तीकडे ८ लाख रुपये लाच मागितली. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये पाटील यांनी घेतले. दुसऱ्या हप्त्यासाठी तगादा लावल्यामुळे या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दोन लाखांचा दुसरा हप्ता घेत असताना पाटीलला पकडण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज