अ‍ॅपशहर

समुद्रात बुडणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी वाचवलं

बांद्रा स्टँड येथील समुद्रात खडकावर निवांत गप्पा मारत बसणं आज काही तरुणांच्या जीवावर बेतलं. मात्र पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने समुद्रात बुडू शकणाऱ्या या ११ तरुणांचे सुदैवाने प्राण वाचले. सागरी बोटीवरील तीन पोलिसांनी जीव धोक्यात घालून खवळलेल्या समुद्रात उडी मारली आणि या तरुणांना वाचवलं. त्यात चार तरुणींचा समावेश आहे. आज दुपारी ही घटना घडली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Apr 2018, 9:34 pm
मुंबई: बांद्रा स्टँड येथील समुद्रात खडकावर निवांत गप्पा मारत बसणं आज काही तरुणांच्या जीवावर बेतलं. मात्र पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने समुद्रात बुडू शकणाऱ्या या ११ तरुणांचे सुदैवाने प्राण वाचले. सागरी बोटीवरील तीन पोलिसांनी जीव धोक्यात घालून खवळलेल्या समुद्रात उडी मारली आणि या तरुणांना वाचवलं. त्यात चार तरुणींचा समावेश आहे. आज दुपारी ही घटना घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police save life drawing 11 youngsters
समुद्रात बुडणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी वाचवलं


समुद्राला ओहोटी होती म्हणून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास काही तरूण-तरुणी वांद्रे किल्ला येथील समुद्र किनाऱ्याजवळील एका खडकावर गप्पा मारत बसले होते. गप्पांमध्ये मश्गूल असलेल्या या तरुणांना समुद्राला भरती आल्याचं कळलंच नाही. अचानक समुद्राचं पाणी वाढल्यानं किनाऱ्यावर जाणं या तरुणांना कठीण होऊन बसलं. त्यातही काही जणांनी धाडस करून समुद्रात उडी मारली आणि कसाबसा किनारा गाठला. मात्र ४ तरुणी आणि ७ तरूण अशा ११ जणांना बाहेर पडता आलं नाही. त्यांनी खडकावर उभे राहूनच एकमेकांचा हात पकडून जीवाच्या आकांतानं आरडोओरडा सुरू केला. त्यातील एकाने १०० नंबरवर कॉल करून पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

त्यानंतर बंदोबस्तावर असलेले वांद्रे पोलीस ठाण्याचे एपीआय महेश गुरव व अमंलदार बिराजदार यांनी घटनास्थळी धाव घेतली व सर्वांना खडकावरच उभे राहण्याच्या सूचना केल्या. त्याचवेळी अजित शिंदे, समीर भोईर आणि नंदू बाळ शिंदे या सागरी बोटीवरील तैनात पोलिसांनी खवळलेल्या समुद्रात उड्या मारून या ११ जणांना सुखरूप बाहेर काढले. हा थरार पाहाण्यासाठी वांद्रे समुद्र किनारी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. 'पोलिसांच्या रुपात देवदूतच भेटल्याने आमचा प्राण वाचू शकला,' अशी प्रतिक्रिया या तरुणांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज