अ‍ॅपशहर

उद्यापर्यंत खातेवाटप जाहीर होणार: अजित पवार

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मंत्रालयात चार तास झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2020, 8:54 pm
मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल असे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मंत्रालयात चार तास झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. खातेवाटपावर वाद सुरू असल्याची चर्चा निरर्थक असल्याचे पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ajit-Pawar


आज मंत्रालयात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे चार तास ही बैठक चालली. खातेवाटपाबाबत अजूनही महाविकास आघाडीत वाद सुरू असल्यामुळे मंत्र्यांना खाती जाहीर करण्यात येत नसल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, या चर्चा निरर्थक असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे १४ आमदार नाराज

मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या या बैठकीत वेगवेगळ्या मुद्यांबाबत चर्चा करण्यात आली. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे पुढील वाटचालीत अडचणी येऊ नयेत या अनुषंगानेही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आज झालेल्या बैठकीत पालक मंत्र्यांबाबतही चर्चा झाली आहे. उद्या, गुरुवार सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर करण्यास काहीही अडचण येणार नाही. त्यामुळे मंत्री आणि त्यांचे खाते व पालक मंत्री यांची घोषणा होईल असेही पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या वाटेला आलेल्या मंत्रीपदे व मंत्र्यांची नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला.


पी. एन. पाटील समर्थक देणार सामूहिक राजीनामे
'काँग्रेस कार्यालय फोडणारे माझे कार्यकर्ते नाहीत'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज