अ‍ॅपशहर

मान्सूनचे केरळात तीन दिवस आधीच स्वागत, दोन दिवसात कोकणात हजेरीची शक्यता

देशातील सर्व नागरिकांची प्रतिक्षा असलेल्या मान्सूनने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. केरळमध्ये मान्सूनने ३ दिवस आधीच प्रवेश केला असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी देखील अनुकूल वातावरण आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 May 2022, 8:03 pm
मुंबई : केरळमध्ये मान्सून नियमीत वेळेच्या ३ दिवस आधी दाखल झाल्याने मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मान्सूनचा पाऊस केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या बऱ्याच भागात पोहचलेला आहे. पुढील २-३ दिवसात मान्सून कोकण-गोवापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत वायव्य राजस्थान, हरियाणा, उ.प्र. बिहार, बंगामध्ये द्रोणीय स्थिती आहे. केरळ आणि सभोवताली ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pre monsoon rain update early rains in kerala
मान्सूनचे केरळात तीन दिवस आधीच स्वागत, दोन दिवसात कोकणात हजेरीची शक्यता


तसेचं अरबी समुद्रात केरळ किणारपट्टीजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे मान्सूनला गती मिळण्याची शक्यता आहे. आज अमरावती, नागपूर, वर्धासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १ जूनला चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेचं, २ ते ७ जूनपर्यंत विदर्भात कोरडे वातावरण असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर तापमान किंचीत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पतीसोबत अफेअर असल्याचा संशय; पत्नीनं ५ जणांना पैसे देऊन बलात्कार करायला लावला
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा रीतीने पूर्व नियोजित पद्धतीने केलेल्या व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज