अ‍ॅपशहर

‘त्या’ गर्भवती महिलेचा प्रश्न न्यायालयात

मुंबई : मुंबईतील एका गर्भवती महिलेच्या गर्भपाताचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. ही महिला २२ आठवड्यांची गर्भवती असून या गर्भाला गंभीर व्यंग असल्याने तिने अॅड. स्नेहा मुखर्जी यांच्यामार्फत गर्भपाताची परवानगी मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कायद्यानुसार २१ आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नसल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.

Maharashtra Times 25 Jul 2017, 5:01 am
मुंबई : मुंबईतील एका गर्भवती महिलेच्या गर्भपाताचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. ही महिला २२ आठवड्यांची गर्भवती असून या गर्भाला गंभीर व्यंग असल्याने तिने अॅड. स्नेहा मुखर्जी यांच्यामार्फत गर्भपाताची परवानगी मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कायद्यानुसार २१ आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नसल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pregnant lady to abort her fetus
‘त्या’ गर्भवती महिलेचा प्रश्न न्यायालयात

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्रा व न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सोमवारी याविषयी सुनावणी झाली. जेजे रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने या महिलेची वैद्यकीय तपासणी करून अहवाल द्यावा, हा अहवाल सरकारी वकिलांनी सीलबंद लिफाफ्यात आमच्यासमोर सादर करावा, असे निर्देश देत खंडपीठाने पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवली.

दरम्यान, 'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत आमच्याकडे आली आहे. आदेशाप्रमाणे तीन तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय समिती स्थापन करण्यात येत आहे. या महिलेची तपासणी करून आम्ही अहवाल देऊ', असे जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी 'म.टा.'ला सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज