अ‍ॅपशहर

मन्मथने आत्महत्याच केली; प्राथमिक माहिती

ज्येष्ठ सनदी अधिकारी मनीषा व मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मन्मथच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना पोलिसांच्या प्राथमिक माहितीत मात्र त्याने आत्महत्याच केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Times 20 Jul 2017, 7:13 am
मुंबई : ज्येष्ठ सनदी अधिकारी मनीषा व मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मन्मथच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना पोलिसांच्या प्राथमिक माहितीत मात्र त्याने आत्महत्याच केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी मन्मथच्या मोबाइलची तपासणी केली असता त्यामध्ये काहीही संशयास्पद आढळून आले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दर्यामहल इमारतीच्या व्यवस्थापनाकडे पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजची मागणी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम primary information suggests manmath committed suicide
मन्मथने आत्महत्याच केली; प्राथमिक माहिती


दर्यामहल इमारतीच्या टेरेसच्या टाकीखाली पोलिसांना मन्मथची बॅग सापडली. मन्मथने इमारतीत प्रवेश केला तेव्हा तो एकटाच असल्याचे इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीतून पुढे आले. मात्र अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी या इमारतीच्या व्यवस्थापनाकडे आणखी सीसीटीव्ही फूटेजची मागणी केली आहे.

मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अग्रवाल नावाच्या मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून तो निघाला. त्यानंतर नेपीयन सी रस्त्यावर असलेल्या दर्यामहल इमरातीखाली त्याचा मृतदेह सापडला होता.

मन्मथच्या मोबाइलवर आलेले अखेरचे दोन कॉल हे आई व त्याच्या मित्राचे होते, असे सूत्रांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज