अ‍ॅपशहर

'असे' वाचले हार्ट अटॅक आलेल्या प्रवाशाचे प्राण

भायखळा स्थानकात एका ५५ वर्षांच्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. सहप्रवाशांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले. हृदयविकाराचा झटका आलेल्या या माणसाला 'गोल्डन अवर' मध्ये उपचार मिळाले. भोलेनाथ रघुनाथ रेंडे हे ट्रेनमध्ये चढलेले होते. तेथेच त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते कोसळले.

Kamal Mishra | Mumbai Mirror 17 Apr 2019, 3:34 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heart-attack


भायखळा स्थानकात एका ५५ वर्षांच्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. सहप्रवाशांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले.

हृदयविकाराचा झटका आलेल्या या माणसाला 'गोल्डन अवर' मध्ये उपचार मिळाले. भोलेनाथ रघुनाथ रेंडे हे ट्रेनमध्ये चढलेले होते. तेथेच त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते कोसळले. सुरुवातीला त्यांना अर्धांगवायूचा झटका देखील आला. एका प्रवाशाकडे आरपीएफ उपनिरीक्षक ब्रजेश कुमार यांचा संपर्क क्रमांक होता. कुमार यांनी पुढच्याच, भायखळा स्थानकावर मदत पाठवली. रेंडे यांच्यावर सध्या ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'आम्ही तत्काळ मदत केल्याबद्दल रेल्वे आरपीएफचे ऋणी आहोत,' असे भोलेनाथ यांचे चुलत भाऊ हेमंत रेंडे म्हणाले. भायखळा स्थानकात आरपीएफ कॉन्स्टेबर रुरमल यादव आणि महाराष्ट्र सुरक्षा स्टाफ किरण चौहान यांनी तत्परता दाखवत रेंडे यांच्यावर आधी प्रथमोपचार केले आणि नंतर रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली.
लेखकाबद्दल
Kamal Mishra

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज