अ‍ॅपशहर

झीनत अमान यांना 'आर डी बर्मन जीवन गौरव'

अप्रतिम सौंदर्य आणि जुन्या काळातील 'मॉड' भूमिकांमुळं सिनेरसिकांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना 'आर डी बर्मन जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. येत्या २२ जून रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2019, 2:22 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम zeenat


अप्रतिम सौंदर्य आणि हिंदी चित्रपटांतील 'मॉड' भूमिकांमुळं सिनेरसिकांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना 'आर डी बर्मन जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. येत्या २२ जून रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

झीनत अमान यांनी अभिनय केलेल्या सुमारे २४ हिंदी चित्रपटांना आर डी बर्मन यांचे संगीत लाभले. हा एक प्रकारचा विक्रमच मानला जातो. यातील किमान १९ चित्रपट सुपरहीट झाले आणि या यशात झीनत आणि आरडी या दोघांचाही महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे यंदा या पुरस्कारासाठी झीनत यांची निवड झाली आहे. एक लाख रुपये आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. झीनत अमान या कार्यक्रमात पंचमदांच्या आठवणींना उजाळा देतील. 'स्वरदा कम्युनिकेशन्स अँड इव्हेंट्स'च्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.

याआधी संगीतकार दिवंगत यशवंत देव, प्रख्यात निवेदक अमीन सयानी यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज