अ‍ॅपशहर

'सैराट' सरकारचा कारभार 'झिंगाट': राधाकृष्ण विखे-पाटील

अहमदनगरमधील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या घटनेवर विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील 'सैराट' सरकारचा कारभार 'झिंगाट' झाला असल्याने लोकांना वेड लागण्याची वेळ आल्याची टीका विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

Maharashtra Times 17 Jul 2016, 5:45 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम radhakrishna vikhe patil attacks govt over kopardi gangrape
'सैराट' सरकारचा कारभार 'झिंगाट': राधाकृष्ण विखे-पाटील


अहमदनगरमधील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या घटनेवर विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील 'सैराट' सरकारचा कारभार 'झिंगाट' झाला असल्याने लोकांना वेड लागण्याची वेळ आल्याची टीका विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले.

कोपर्डी येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेला तीन दिवस झाले तरीही मुख्यमंत्र्यांनी साधे निवेदनही काढले नाही. पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, ही खेदाची बाब आहे. गृहमंत्री म्हणून ही त्यांची जबाबदारी असल्याचे विखे-पाटील म्हणाले. त्यांनी यावेळी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा, अशी मागणी केली.

सरकार टि्वटरवर चालतंय का?

सरकारमधील मंत्र्यांमध्ये संवाद योग्य नाही, हे सरकार ट्विटरवर चालतंय का? मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे भ्रष्ट्राचाराचा विस्तार असल्याची टीका विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि धनंजय मुंढे यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज