अ‍ॅपशहर

घोषणांचा पाऊस थांबवा; विखेंचा सरकारला टोला

औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय म्हणजे या सरकारची ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या सरकारने घोषणा तर वारेमाप केल्या. पण त्यासाठी लागणारा निधी कुठून उभा करणार? हे मात्र स्पष्ट केलेले नाही. याआधीही या सरकारने घोषणांचा पाऊस पाडला होता. त्याच्या पुर्ततेचे काय झाले? त्याबाबत सरकारने अवाक्षरही काढलेले नाही, असा आरोपही विखेंनी केला.

Maharashtra Times 4 Oct 2016, 8:03 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम radhakrishna vikhe patil slams maharashtra government
घोषणांचा पाऊस थांबवा; विखेंचा सरकारला टोला


औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय म्हणजे या सरकारची ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

या सरकारने घोषणा तर वारेमाप केल्या. पण त्यासाठी लागणारा निधी कुठून उभा करणार? हे मात्र स्पष्ट केलेले नाही. याआधीही या सरकारने घोषणांचा पाऊस पाडला होता. त्याच्या पुर्ततेचे काय झाले? त्याबाबत सरकारने अवाक्षरही काढलेले नाही, असा आरोपही विखेंनी केला.

मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ होता. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली पण त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि खरिप वाया गेला. जनावरांची वाताहत झाली. मराठवाड्यात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असताना शेतकऱ्यांना विनाविलंब कर्जमाफी जाहीर केली असती तर शेतकऱ्यांना अधिक दिलासा मिळाला असता. पण सरकारने केवळ वारेमाप घोषणा करण्यावरच भर दिला, असा आरोपही विखेंनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्यवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे म्हटले होते, ही योग्य वेळ शेतकऱ्यांचे अजून किती नुकसान झाल्यानंतर येणार आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज