अ‍ॅपशहर

मध्य रेल्वेची कल्याण-कसारा वाहतूक रखडली

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील आसनगाव स्थानकाजवळ एका मालगाडीचे इंजिन आज सकाळी बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या गोंधळाचा फटका चाकरमान्यांना बसला. बिघाड दुरुस्त झाला असून वाहतूक पूर्वपदावर येण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 2 May 2016, 8:40 am
मटा ऑनलाइन वृत्त । कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway timetable disturb
मध्य रेल्वेची कल्याण-कसारा वाहतूक रखडली


मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील आसनगाव स्थानकाजवळ एका मालगाडीचे इंजिन आज सकाळी बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या गोंधळाचा फटका चाकरमान्यांना बसला.

आज सकाळी आसनगाव-वाशिंद या स्थानकांदरम्यान एका मालगाडीचे इंजिन बिघडले. त्यामुळे कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बिघाड दुरुस्त करण्यास लागणारा वेळ लक्षात घेऊन कसारा, आसनगाव या गाड्या टिटवाळ्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. तशा घोषणाही मध्य रेल्वेच्या स्थानकांवर सुरू होत्या. सुमारे तासभरानंतर हा बिघाड दुरुस्त झाला. मात्र वाहतूक पूर्वपदावर येण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज