अ‍ॅपशहर

मुंबईत पावसाचा जोर; नालासोपारात चौघे वाहून गेले

मुंबईत पावसाने दाणादाण उडवली असून वसई-विरार-पालघर पट्ट्यात तुफान पाऊस कोसळत आहे. नालासोपारा येथील नेवाळे ते देसाईवाडी भागातील चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेले असून यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

Maharashtra Times 20 Sep 2017, 8:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain batters mumbai 108 flights cancelled
मुंबईत पावसाचा जोर; नालासोपारात चौघे वाहून गेले


मुंबईत पावसाने दाणादाण उडवली असून वसई-विरार-पालघर पट्ट्यात तुफान पाऊस कोसळत आहे. नालासोपारा येथील नेवाळे ते देसाईवाडी भागातील चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेले असून यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

पावसामुळे आज लोकलच्या तिनही मार्गावर गाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेला सर्वात मोठा फटका बसला. वसई-विरार-पालघर पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे नालासोपारा येथे ट्रॅक पाण्याखाली गेला होता. आज पहाटे ४ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेमार्गावरील १२६ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या तर ११५ गाड्या उशिराने धावल्या. मध्य रेल्वेवर गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने तर हार्बरवर गाड्या २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

मुख्य रनवेवर चिखलात स्पाइसजेटचे विमान रुतल्याने तसेच मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील विमानसेवा कोलमडली. दिवसभरात १०८ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली तर ५१ विमाने अन्यत्र वळवण्यात आली. दरम्यान, रनवेवर अडकलेले विमान टो करून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत मुख्य रनवे बंद राहणार असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईजवळ समुद्रात १३७ नॉटिकल मैल अंतरावर एक मासेमारी बोट अडकली असून बोटीतील १४ खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहीती आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज