अ‍ॅपशहर

मुंबईमध्ये रात्रभर पाऊस

रात्रभर कोसळणाऱ्या संततधार पावसाचा फटका मुंबईतील मध्य व हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांच्या वाहतुकीला बसला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशीराने धावत असून हार्बर लाइनवरील गाड्याही उशीराने धावत आहेत.

Maharashtra Times 27 Jun 2017, 9:05 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rains lash parts of mumbai heavy waterlogging reported local trains also affected
मुंबईमध्ये रात्रभर पाऊस


रात्रभर कोसळणाऱ्या संततधार पावसाचा फटका मुंबईतील मध्य व हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांच्या वाहतुकीला बसला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशीराने धावत असून हार्बर लाइनवरील गाड्याही उशीराने धावत आहेत.

रात्रभर मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे जोर ओसरलेला नाही. शीव (सायन) स्थानकाजवळ ट्रॅक पाण्याखाली गेल्याने मुंबईकडे येणाऱ्या धीम्या मार्गावरील काही गाड्यांची वाहतूक माटुंग्यापर्यंत जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. कुर्ल्याजवळ अप स्लो लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी साडेसहापासूनच विद्याविहार ते कुर्ला स्थानकांमध्ये गाड्यांची रांग लागली होती. अनेक प्रवाशींनी चालत जवळचे स्टेशन गाठले.

रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी तुंबले आहे. सायन हिंदमाता, किंग्स सर्कल भागामध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याप्रमाणे पश्चिम मुंबईत अंधेरी, जोगेश्वरी, विक्रोळी लिंकरोड परिसरात पाणी साठले आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्येही रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज