अ‍ॅपशहर

राज ठाकरेंनी घे‌तली जखमी तुरडेंची भेट

राज ठाकरे यांनी शनिवारी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात जाऊन मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांची भेट घेतली.

Maharashtra Times 26 Feb 2017, 3:51 am
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात जाऊन मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांची भेट घेतली. महापालिका निवडणुकीत तुरडे यांच्या विजयानंतर त्यांच्यावर भाजपच्या पराभूत उमेदवाराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी झालेल्या तुरडे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj meets sanjay turde
राज ठाकरेंनी घे‌तली जखमी तुरडेंची भेट


कलिना वॉर्ड क्रमांक १६६ मध्ये मनसेचे उमेदवार संजय तुरडे हे विजयी झाले. त्यांच्या विजयाचा ते आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह आनंद साजरा करत असताना भाजपचा पराभूत उमेदवार आणि त्यांच्या साथीदाराने तुरडे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. राज ठाकरे यांनी तुरडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि पक्ष पाठिशी उभा असल्याचे सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज