अ‍ॅपशहर

ram mandir : राम मंदिराच्या भूमिपूजनाची ही वेळ नाही; राज ठाकरेंनी केंद्राला सुनावलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray ) यांनी राम जन्मभूमिच्या भूमिपूजनावर (ram mandir bhumi poojan) सुरू असलेल्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. राम मंदिराचं भूमिपूजन व्हायलाच हवं. पण भूमिपूजनासाठीची ही वेळ नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2020, 11:20 am
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचं ई-भूमिपूजन करण्याचा केंद्र सरकारला सल्ला दिलेला असतानाच याच मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे. राम मंदिराचं भूमिपूजन व्हावं. पण भूमिपूजनासाठीची ही वेळ नाही, असं सांगतानाच करोनाचं संकट असताना भूमिपूजनासाठी हीच वेळ का निवडली?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj thackeray


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राम जन्मभूमिच्या भूमिपूजनावर सुरू असलेल्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. राम मंदिराचं भूमिपूजन व्हायलाच हवं. मंदिराचं भूमिपूजन होत असेल तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. पण भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला हवं. पण सध्या करोनाचं संकट आहे. त्यामुळे आता भूमिपूजन करणं योग्य नाही. भूमिपूजनासाठीची ही वेळ नाही. ही वेळ का निवडली हेच कळत नाही, असं राज म्हणाले.

अकोल्यात लॉकडाऊनविरोधात असहकार; आंबेडकरांना हॉटेल व्यावसायिकांचा पाठिंबा

करोनाचं संकट आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे हे संकट गेलं असतं तर दोन महिन्यानंतरही भूमिपूजन करता आलं असतं. जगण्याची हमी आली असती तर लोकांनीही या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेतला असता, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला ई-भूमिपूजन करण्याचा दिलेल्या सल्ल्याशी असहमती दर्शवली. एवढ्या संघर्षानंतर राम मंदिर होत आहे. या मंदिरासाठी असंख्य लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे. असा ऐतिहासिक सोहळा हा धुमधडाक्यातच व्हायला हवा. करोनाचं संकट आहे म्हणून त्यावर ई-भूमिपूजन होऊ शकत नाही. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको. त्याचं जल्लोषात भूमिपूजन हवं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Corona Live : देशात २४ तासांत ७७९ मृत्यूची नोंद

उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसले; काम दिसलंच नाही- राज ठाकरे

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिराच्या भूमिपूजनावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार की नाही? एक व्यक्ती म्हणून हो की नाही हे मी काहीही सांगेल. मी मुख्यमंत्री आहे, पूर्ण सुरक्षेत मी व्यवस्थित जाऊन येईलही. मुद्दा तो नाही. एखाद्या गावात मंदिर बांधायचं असेल तर मोठा जल्लोष केला जातो. लोक मंदिर निर्माणाच्या कार्यात भाग घेतात. उत्सुकता असते. चैतन्य सळसळतं. अयोध्येतील राम मंदिर हे काही सर्वसामान्य मंदिर नाही. या मंदिराला लढ्याची पार्श्वभूमी आहे. इतिहास आहे. हा जागतिक कुतुहुलाचा विषयही आहे. रामभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अनेक वर्षांपासून ते या क्षणाची वाट पाहत होते. त्यांच्या भावनेचं काय करणार? लाखो राम भक्तांना राम मंदिराच्या भूमिपूजनाला येऊ देणार की अडवणार? कि कळत न कळत त्यांच्यात करोनाचा प्रसार होऊ देणार? असा सवाल करतानाच करोनामुळे आपण नागरिकांना मंदिरातही जाण्यास बंदी घातली आहे. अशावेळी तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही भूमिपूजन करू शकता. ई-भूमिपूजनही करू शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज