अ‍ॅपशहर

'टाळी देण्याचा निर्णय राज ठाकरेच घेतील'

मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय अंतिम निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेच घेतील आणि हा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल,असे सांगत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना- मनसे युतीच्या चर्चेला

Maharashtra Times 27 Feb 2017, 2:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj thackeray will take decision for marathi manus says bala nandgaonkar
'टाळी देण्याचा निर्णय राज ठाकरेच घेतील'


मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय अंतिम निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेच घेतील आणि हा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल,असे सांगत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना- मनसे युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे. त्यामुळे शिवसेनेला मनसे टाळी देण्याची शक्यता बळावली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी हे संकेत दिले. राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्रही नसतो. राजकारणात लवचिकताही फार महत्त्वाची असते आणि लवचिकता कधी घ्यायची हे राजकारण्यांना कळले पाहिजे असे मत व्यक्त करत मनसेच्या आगामी रणनितीचे संकेतच नांदगावकर यांनी दिले आहेत. मनसे आणि शिवसेना महापालिकेत एकत्र आले असते तर शिवसेनेच्या जागा वाढल्या असत्या आणि शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती असे मीडियाच सांगत आहे. त्यामुळे आमची त्यावेळची भूमिका योग्यच होती, हेच यातून दिसून येत असल्याचंही ते म्हणाले. भाजपला रोखण्याची हीच वेळ असून शिवसेनेला उशीरा का होईना आमचं म्हणणं पटलं, त्याचा आम्हाला आनंद आहे, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज