अ‍ॅपशहर

राज यांच्या कुंचल्यातून मोदी-शहांवर निशाणा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे चेंडूशी छेडछाड करण्याचे प्रकरण चांगलेच गाजत असून त्याचा संदर्भ देत राज यांनी मोदी आणि शहा यांची खिल्ली उडवली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2018, 7:02 pm
मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे चेंडूशी छेडछाड करण्याचे प्रकरण चांगलेच गाजत असून त्याचा संदर्भ देत राज यांनी मोदी आणि शहा यांची खिल्ली उडवली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj thackerays new cartoon on modi shaha dressing room conversation
राज यांच्या कुंचल्यातून मोदी-शहांवर निशाणा


राज यांनी 'दिल्लीत ड्रेसिंग रूममधील चर्चा' या शिर्षकाखाली काढलेल्या या व्यंगचित्रात मोदी आणि शहा यांना दाखविले आहे. मोदी आणि शहा ड्रेसिंग रूममध्ये चर्चा करत आहेत. शहा यांच्या हातात चेंडू असून त्यावर २०१४ चे जुमले असं लिहिलं आहे. या चेंडूकडे मोदींना निरखून पाहताना दाखविलं आहे. 'गोतमभाईला सांगून ऑस्ट्रेलियापासून पोलिस पेपर ( पॉलिश पेपर ) मांगवून घासून पायला ( पाहिला) पन हे बोल ( चेंडू ) स्विंग होएलस वाटात नाय !,' अशी चर्चा मोदी आणि शहा करत असल्याचं व्यंगचित्रात चितारण्यात आलं आहे. राज यांनी हे व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज