अ‍ॅपशहर

राजाबाई टॉवरचा 'युनेस्को गौरव'

'युनेस्को'तर्फे मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि ग्रंथालय इमारतीला 'एशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज कन्झर्वेशन अॅवॉर्ड-२०१८' हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवारी विद्यापीठात पार पडले.

महाराष्ट्र टाइम्स 22 Aug 2019, 4:00 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः 'युनेस्को'तर्फे मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि ग्रंथालय इमारतीला 'एशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज कन्झर्वेशन अॅवॉर्ड-२०१८' हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवारी विद्यापीठात पार पडले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम RAJABAI


शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या मदतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले. शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे पर्यटनही सुरू करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, इंडियन हरिटेज सोसायटीच्या अध्यक्ष अनिता गरवारे, 'युनिस्को'चे संचालक एरिक फाल्ट, 'टीसीएस'चे एन. जी. सुब्रमण्यम, डॉ. ब्रिंदा सोमय्या, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज