अ‍ॅपशहर

राजधानी एक्स्प्रेसचा अंधेरी थांबा रद्द

पश्चिम रेल्वेने लोकल सेवांचा वक्तशीरपणा नियमित राखण्यासाठी नवीन पर्याय मांडला आहे. त्यात एका राजधानी एक्स्प्रेसचा अंधेरी स्थानकातील थांबा रद्द करण्याची शिफारस केली आहे.

Maharashtra Times 23 Oct 2017, 6:22 am
मुंबई : पश्चिम रेल्वेने लोकल सेवांचा वक्तशीरपणा नियमित राखण्यासाठी नवीन पर्याय मांडला आहे. त्यात एका राजधानी एक्स्प्रेसचा अंधेरी स्थानकातील थांबा रद्द करण्याची शिफारस केली आहे. सकाळच्या आणि सायंकाळच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळेस ये-जा करणाऱ्या ऑगस्ट क्रांती राजधानी मुंबई सेंट्रल-हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेसचे अंधेरी स्थानकातील थांबा रद्द केल्यास लोकल वेळापत्रकातील वक्तशीरपणात वाढ होईल, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajdhani express andheri stop cancelled
राजधानी एक्स्प्रेसचा अंधेरी थांबा रद्द


मुंबई सेंट्रल ते नवी दिल्लीपर्यंत जाणाऱ्या एक्स्प्रेसला अंधेरी आणि बोरिवलीमध्ये थांबा देण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी एक्स्प्रेस दोन मिनिटांसाठी थांबविण्यात येते. हा थांबा केवळ दोन मिनिटांसाठी असला तरी या गाडीस २० डबे असून ही गाडी स्थानकावर धीमी करणे आणि पुन्हा नव्याने चालविणे या साऱ्यात काही मिनिटांचा अपव्यय होतो. त्यात लोकल सेवेवर आठ ते १० मिनिटांचा परिणाम होतो. अंधेरी स्थानकावर सुमारे ११० किमी प्रतितासाने येणारी गाडी थांबविणे, पुन्हा चालविणे आदींमुळे लोकल सेवांवर परिणाम होतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज