अ‍ॅपशहर

रामदास आठवलेंचा कोपर्डी दौरा रद्द

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे शाळकरी मुलीवर झालेला बलात्कार व निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी निघालेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपला दौरा अचानक रद्द केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं.

Maharashtra Times 23 Jul 2016, 11:54 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramdas athawale cancells kopardi visit
रामदास आठवलेंचा कोपर्डी दौरा रद्द

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे शाळकरी मुलीवर झालेला बलात्कार व निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी निघालेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपला दौरा अचानक रद्द केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं.

कोपर्डीतील घटनेमुळं सध्या तिथं प्रचंड तणाव आहे. बलात्काराचे आरोपी दलित असल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग आला आहे. राजकीय नेतेमंडळी तिथं गेल्यास परिस्थिती चिघळू शकते हे लक्षात घेऊन राज्य सरकार विशेष खबरदारी घेत आहे. रामदास आठवले आज पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी कोपर्डीकडं निघाले होते. त्यासाठी सकाळी ते मुंबई विमानतळावर पोहोचलेही होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. पीडित कुटुंबाला कोपर्डीबाहेर हलवण्यात आलं आहे. त्यामुळं तिथं जाऊन उपयोग होणार नाही. शिवाय, तिथं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं मुख्यमंत्र्यांनी आठवले यांना सांगितल्याचं समजतं. त्यानंतर आठवले यांनी हा दौरा रद्द केला आहे.

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही याआधी पोलिसांनी कोपर्डीला जाण्यापासून रोखलं होतं. दरम्यान, दलित नेते प्रा. जोगेंद्र कवाडे आज कोपर्डीला जाण्यासाठी नगरमध्ये पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना नगरमध्येच अडवलं. त्यामुळं त्यांनी नगरमध्येच पत्रकारांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज