अ‍ॅपशहर

शिवसेनेला दोन अपक्षांचे बळ

शिवसेनेची मुंबईतील घोडदौड ८४ जागांवरच थांबल्याने बहुमताची वाट खडतर झाली असताना सेनेने सत्ता राखण्यासाठी बंडखोरांची मनधरणी सुरू केली आहे. वॉर्ड क्र. १२३ मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार स्नेहल मोरे तसेच मालाड पश्चिम येथील वॉर्ड क्र. ४१ मधील अपक्ष उमेदवार तुळशीराम शिंदे यांचं मन वळवण्यात सेनेला यश आलं आहे.

Maharashtra Times 24 Feb 2017, 1:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rebel corporator snehal more to join shivsena today
शिवसेनेला दोन अपक्षांचे बळ


शिवसेनेची मुंबईतील घोडदौड ८४ जागांवरच थांबल्याने बहुमताची वाट खडतर झाली असताना सेनेने सत्ता राखण्यासाठी बंडखोरांची मनधरणी सुरू केली आहे. वॉर्ड क्र. १२३ मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार स्नेहल मोरे तसेच मालाड पश्चिम येथील वॉर्ड क्र. ४१ मधील अपक्ष उमेदवार तुळशीराम शिंदे यांचं मन वळवण्यात सेनेला यश आलं आहे. ठाण्याचा गड जिंकणारे एकनाथ शिंदे तुळशीराम यांच्या संपर्कात आहेत, असे सांगण्यात आले.

पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली होती. वहिनी स्नेहल मोरे यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षाविरोधात दंड थोपटले होते. स्नेहल मोरे अपक्ष म्हणून विक्रोळीतील वॉर्ड क्र. १२३ मधून मैदानात उतरल्या होत्या. प्रचारादरम्यानही मोरे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, आता स्नेहल मोरे यांचा विजय झाल्यानंतर सगळा तणाव निवळला असून मोरे यांनी सेनेची स्वगृही परतण्याची विनंतीही मान्य केली आहे.

सुधीर मोरे यांच्यासह त्यांच्या वहिनी स्नेहल मोरे आज मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. तसेच तुळशीराम शिंदे हेही शिवसेनेसोबत जाणार आहेत त्यामुळे सेनेचं संख्याबळ ८४ वरून ८६ होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज