अ‍ॅपशहर

विश्वास पाटील यांना तूर्तास दिलासा

मालाड येथील एसआरए योजनेतील भूखंड वाटपाच्या गैरव्यवहारप्रकरणी एसआरएचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्वास पाटील यांच्याविरुध्द ८ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक फिर्याद ( एफआयआर) नोंदविण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मनाई केली.

Maharashtra Times 10 Aug 2017, 4:18 am
मुंबई: मालाड येथील एसआरए योजनेतील भूखंड वाटपाच्या गैरव्यवहारप्रकरणी एसआरएचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्वास पाटील यांच्याविरुध्द ८ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक फिर्याद ( एफआयआर) नोंदविण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मनाई केली. त्यामुळे विश्वास पाटील यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम relief to vishwas patil
विश्वास पाटील यांना तूर्तास दिलासा


या प्रकरणी यापूर्वी न्या. व्ही. के. ताहिरलमानी यांच्या खंडपीठापुढे विश्वास पाटील यांनी केलेल्या आव्हान अर्जावर सुनावणी झाली होती, त्यांनी ९ ऑगस्टपर्यंत एफआयआर दाखल करण्यास मनाई केली होती. ती मुदत संपल्याने बुधवारच्या सुनावणीत ती पुन्हा वाढविण्यात येऊन ८ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. पाटील यांच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने खटला भरावा, असा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यात त्यांनी खटल्यासाठी अनुमती देताना निवृत्त सनदी अधिकाऱ्याविरुध्द खटला भरण्यासाठी राज्य सरकारच्या संमतीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तो मुद्दा चुकीचा असून राज्य सरकारच्या संमतीविना एफआयआर नोंदविता येणार नसल्याचा दावा पाटील यांच्या वतीने करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज