राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी रात्री मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन, भाजपसोबत जाण्याचा अजित पवार यांचा मनसुबा सहन करता येणार नाही. त्यामुळे त्यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेता म्हणून ३० ऑक्टोबर २०१९ रोजी झालेली निवड रद्द करण्यात येत आहे, असा ठराव करण्यात आला. विधिमंडळ कामकाज नियम आणि इतर अनुषंगिक नियम व संविधानाप्रमाणे शनिवार, २३ नोव्हेंबरपासून अजित पवार यांचे पक्षनेता म्हणून व्हीप काढण्याचे सर्व अधिकार रद्दबातल करण्यात येत आहेत. तसेच राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेता पदाचे सर्व संवैधानिक अधिकार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत. अजित पवार यांच्या भूमिकेवर पुढील निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार शरद पवार आणि जयंत पाटील यांना देण्याचा ठरावही आमदारांच्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला आहे, अशी माहिती पक्षातर्फे देण्यात आली.
विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी रात्री मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2019, 4:00 am