अ‍ॅपशहर

डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाने रुग्णांचे हाल

डॉक्टरांना मारहाण प्रकरणांचा निषेध म्हणून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी आज एक दिवसाची सामूहिक रजा घेतली आहे. आधी मुंबईतल्या तीन रुग्णालयांपर्यंत मर्यादित असणाऱ्या या आंदोलनाची व्याप्ती आज राज्यभर वाढली. रुग्णांचे यामुळे हाल होत आहेत. दरम्यान, सुरक्षा रक्षक नेमून डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

Maharashtra Times 20 Mar 2017, 3:35 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम resident doctors on mass leave
डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाने रुग्णांचे हाल

डॉक्टरांना मारहाण प्रकरणांचा निषेध म्हणून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी आज एक दिवसाची सामूहिक रजा घेतली आहे. आधी मुंबईतल्या तीन रुग्णालयांपर्यंत मर्यादित असणाऱ्या या आंदोलनाची व्याप्ती आज राज्यभर वाढली. रुग्णांचे यामुळे हाल होत आहेत. दरम्यान, सुरक्षा रक्षक नेमून डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे केवळ अतिदक्षता विभागातल्या तसेच तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जात आहेत. मात्र अद्यापही हे आंदोलन मागे घेण्यात आलेले नाही. 'आमची महापौरांशी आणि पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी आश्वासन दिले. मात्र आम्ही सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना गेटपास देण्याची पद्धत तातडीने सुरू करण्याची मागणी करत आहोत. अद्याप डॉक्टर कामावर रुजू होण्याच्या मानसिकतेत नाहीत,' असे मार्डचे सल्लागार आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या युथ विंगचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी 'मटा ऑनलाइन' ला सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स (मार्ड) आंदोलन करू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सामुहिक रजा घेतली आहे. कामावर रुजू व्हा अन्यथा कारवाई करू असा इशारा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी डाॅक्टरांना दिला आहे.

आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांची डॉक्टरांशी या समस्येबाबत चर्चा झाली. 'डॉक्टरांवर होत असलेले हल्ले गंभीर आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ११०० सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत. सुरक्षेच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली जाईल. याबाबत विविध स्तरावर बैठक सुरू आहे,' असे महाजन यांनी नाशिक येथे सांगितले. मार्डच्या सर्व समस्या समजून योग्य कार्यवाही केली जाईल. डॉक्टरांना मारहाण होणे ही निंदनीय घटना आहे. डॉक्टर आणि रुग्ण यात सुसंवादाचा अभाव आहे. दोघांनीही सामंजस्य ठेवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

चौकशीसाठी विशेष समिती

डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अभ्यास करून सरकारला शिफारस करण्यासाठी निवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील १६ मेडिकल कॉलेजची पाहणी करणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज