अ‍ॅपशहर

लाखो कुटुंबांना खुशखबर; मुख्यमंत्री मोठ्या निर्णयाच्या तयारीत

लॉकडाऊन लागू झाल्यापासूनच आर्थिक संकटात असलेल्या वाहनधारकांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यावसायिक वाहनधारकांना सहा महिन्यांसाठी रस्ते करातून सूट देऊ शकतात. व्यावसायिक वाहनधारकांना वर्षाला रस्ते कर भरावा लागतो. राज्य सरकार जवळपास ७०० कोटी रुपये माफ करणार आहे.

Authored byPrafulla Marapakwar | Edited byविशाल बडे | Mumbai Mirror 26 Aug 2020, 11:55 am
मुंबई : राज्यातील वाहतूक क्षेत्राला वित्तीय सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे वाहतूक क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून अनेक वाहनधारक आर्थिक संकटात आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हा निर्णय घेणार आहेत. वाहतूक क्षेत्राला पुन्हा उभारी यावी यासाठी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळासाठी राज्यातील ११.४ लाख व्यावसायिक वाहनांना ७०० कोटी रुपयांची रस्ते कर माफी देण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम road tax waiver likely in maharashtra
लाखो कुटुंबांना खुशखबर; मुख्यमंत्री मोठ्या निर्णयाच्या तयारीत


कहर सुरूच! दिवसभरात ३२९ रुग्णांचा मृत्यू; १२ हजार करोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतच्या हालचाली सुरू केल्या होत्या. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात ११.४ लाख नोंदणीकृत व्यावसायिक वाहने आहेत. यामध्ये पर्यटक टॅक्सी, मिनी बस, बस, स्कुल बस, ट्रक, टँकर आणि मालवाहू वाहने यांचा समावेश होतो. लॉकडाऊन केल्यापासूनच या सर्वांचा व्यवसाय ठप्प आहे. वाहन मालक आणि त्यांच्या संघटनांकडून राज्य सरकारला अनेकदा याबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेच या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी कर माफी करणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.

करोनामुळे पतीचा मृत्यू झाल्यास पैश्यांवर केवळ पहिल्या पत्नीचा हक्क : कोर्ट

अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड आणि हरियाणा यासह १२ पेक्षा जास्त राज्यांनी सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांना रस्ते करातून सूट दिली आहे. महाराष्ट्रात वाहनांचे दोन वर्ग आहेत. वर्षाला रस्ते कर देणाऱ्या वाहनांची संख्या ११.४ लाख एवढी आहे. त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांसाठी व्यावसायिक वाहनांना रस्ते करातून सूट दिली जाणार आहे.

ई पासची गरजच संपलीय, लोक खिल्ली उडवताहेत: फडणवीस

राज्य सरकारला वाहतूक विभागाकडून सध्या कोणताही कर येत नाही. शिवाय सध्या पेट्रोल आणि डिझेलची विक्रीही कमी असल्यामुळे सरकारी महसूलही कमी आहे. याशिवाय विमा क्षेत्रही संकटात आहे. अनेक वाहन मालकांनी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन वाहने घेतलेली आहेत. त्यांना कर्ज परतफेड करण्यासाठी अडचणी येत आहेत.

हे भयंकरच! भररस्त्यावर वापरलेले पीपीई किट फेकले; जळगावकर घाबरले

दरम्यान, राज्यावरील कर्जाचा बोजा ५.४ लाख कोटींवर गेला असताना मुख्यमंत्र्यांचा हा धाडसी निर्णय असल्याचं अधिकारी सांगतात. मुख्यमंत्र्यांसमोर आणखी एक प्रस्ताव आहे. ज्यात अचूक वीज बिले आलेली १६०० कोटी रुपयांची माफी देण्याची मागणी आहे. पण पुढच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येणार की नाही हे अजून निश्चित नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज