अ‍ॅपशहर

मुंबईचे रस्ते पोकेमॉन पकडण्यासाठी नाहीत

‘आयुष्य म्हणजे काही गेम नव्हे… आणि रस्त्यावर खेळला जाणारा तर मुळीच नव्हे,’ अशा खोचक शब्दात मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून पोकेमॉनच्या मागे धावणाऱ्या तरुणाईला संदेश दिला आहे.

Maharashtra Times 26 Jul 2016, 4:00 am
पोलिसांकडून तरुणाईची ट्विटरवर कानउघाडणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम roads are not to catch pokemon
मुंबईचे रस्ते पोकेमॉन पकडण्यासाठी नाहीत


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

‘आयुष्य म्हणजे काही गेम नव्हे… आणि रस्त्यावर खेळला जाणारा तर मुळीच नव्हे,’ अशा खोचक शब्दात मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून पोकेमॉनच्या मागे धावणाऱ्या तरुणाईला संदेश दिला आहे. पोलिसांनी एका ‘जीफ’ इमेजच्या (ग्राफिक इंटरफेस फॉरमॅट म्हणजेच दहा-पंधरा सेंकदांच्या व्हिडीओसारखा हलणारा फोटो) माध्यमातून मुंबईतील रस्ते पोकेमॉन पकडण्यासाठी नाहीत, हे तरुणाईला सांगितले आहे. ही ट्विट्स शेकडोच्या संख्येने रीट्विट झाली आहेत.

पोकेमॉन गेमसंदर्भात तरुणाईने स्वत:च्या आणि आजूबाजूच्यांच्या सुरक्षेशी तडजोड करू नये, म्हणून मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून मोबाइल गेम्सबद्दल सतर्कता बाळगण्याचे सल्ले दिले आहेत. मुंबई पोलिसांनी पोस्ट केलेल्या दोन ट्विटमधून तरुणाईच्या भाषेत त्यांना स्मार्ट पद्धतीने आपला मुद्दा समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पोकेमॉन गो आणि इतर मोबाइल गेम्सबद्दल ट्विट केलेल्या जीफ इमेजमध्ये पोलिसांनी शब्दीक कोट्यांचा वापर केला आहे. पोकिमॉन गो या गेमच्या नावावरून संदेश देताना पोलिसांनी ‘Pokémon can’t Go, out on streets, causing distraction’ हा संदेश दिला आहे. रस्ते सुरक्षा मोहिमेचा #RoadSafety अंतर्गत पोलिसांनी हे दोन ट्विट केले आहे.

दोन दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये तरुणाईच्या चर्चेचा विषय असणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय सिरीजच्या नावावरून ‘गेम्स ऑफ मोबाइल’ अशी इमेज पोस्ट करण्यात आली आहे. त्या इमेजवर याच सिरीजमधील 'What we don't know is usually what gets us killed' हा संवाद टाकून त्याबरोबर रस्ते ही गेम खेळण्याची योग्य जागा नाही असे मुंबई पोलिसांनी स्मार्ट नेटिझन्सला सांगितले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज