अ‍ॅपशहर

विनायक मेटेंसाठी २० लाखांची कार खरेदी

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्यासाठी राज्यसरकार २० लाखाची कार खरेदी करणार आहे. सरकारवर ४.३३ लाख कोटींचं कर्ज असल्याचं सांगणाऱ्या राज्यसरकारने एवढी महागडी कार खरेदी करण्यास हिरवा कंदिल दर्शविल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Prafulla Marapakwar | TIMESOFINDIA.COM 19 Apr 2018, 10:46 am
मुंबई: शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्यासाठी राज्यसरकार २० लाखाची कार खरेदी करणार आहे. सरकारवर ४.३३ लाख कोटींचं कर्ज असल्याचं सांगणाऱ्या राज्यसरकारने एवढी महागडी कार खरेदी करण्यास हिरवा कंदिल दर्शविल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rs 20 lakh car for shivaji memorial panel chief
विनायक मेटेंसाठी २० लाखांची कार खरेदी


सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारीच कार खरेदीसाठी ऑर्डर काढली आहे. दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कार खरेदीच्या निर्णयाला विरोध केला होता. शिवस्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षांसाठी कार खरेदी करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं सांगत मुनगंटीवार यांनी हा विरोध दर्शविला होता. मात्र त्यांचा विरोध डावलून कार खरेदीची ऑर्डर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे ही कार खरेदी केली जाणार असून नंतर ती मेटेंना हस्तांतरीत केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नवीन कार खरेदी करण्यात आली तरी त्यासाठी ड्रायव्हरची पोस्ट भरण्यात येणार नाही. विभागाकडूनच ड्रायव्हर पुरविला जाणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं स्पष्ट केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज