अ‍ॅपशहर

सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य, म्हणाले जात ही देवाने नाही तर पंडितांनी निर्माण केली

Mohan Bhagwat on Cast System : जात ही देवाने निर्माण केलेली नाही, तर ती पंडितांची देण आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत केले आहे.

Authored byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2023, 10:46 pm
मुंबई : एकीकडे रामचरितमानसवरून वाद सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातिव्यवस्थेवर भाष्य केले आहे. जात ही देवाने नाही तर ती पंडितांनी निर्माण केली आहे. देवाने नेहमीच सांगितले आहे की माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यात कोणतीही जात-वर्ण नाही. पण पंडितांनी एक वर्गवारी केली जी चुकीची होती, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mohan Bhagwat on Cast System
सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य


मुंबईत संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान संघ प्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे. देशात विवेक, चेतना या सर्व एक आहेत, त्यात काही फरक नाही, फक्त मते भिन्न आहेत.

क्लिक करा आणि वाचा- बीआरएस पक्षाची राज्याच्या राजकारणात एंट्री, दोन माजी आमदारांचा प्रवेश, राव यांनी मोदींना ललकारले

सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले की, आमच्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी घेतला आहे. याचा फायदा घेऊन आपल्या देशात हल्ले झाले. याचा बाहेरून आलेल्या लोकांनी फायदा घेतला. देशात हिंदू समाज उद्ध्वस्त होण्याची भीती दिसत आहे का, असा सवाल त्यांनी केला. कोणताही ब्राह्मण तुम्हाला हे सांगू शकत नाही. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आपल्या आजीविकेचा अर्थ समाजाप्रती जबाबदारी हा देखील असतो. जर प्रत्येक काम समाजासाठी असते, तर मग कोणी उच्च, कोणी नीच, किंवा कोणी वेगळे कसे होऊ शकतात, असेही भागवत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- मन सुन्न करणारी घटना! १० वर्षांपूर्वी वडिलांना संपवले, आता आईलाचाही घेतला जीव, पेंशनसाठी मुलगा बनला हैवान

भागवत यांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी त्यांचं स्वागत केलं.

मोहन भागवत यांनी घेतले श्री. सिद्धिविनायकाचे दर्शन


क्लिक करा आणि वाचा- लग्न झाले, धुमधडाक्यात वरातही निघाली, नवरीच्या चेहऱ्यावरील पदर उचलताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली
लेखकाबद्दल
सुनील तांबे
सुनील तांबे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सी न्यूज, ईटीव्ही मराठी वृत्तवाहिनी या वाहिन्यांमध्ये प्रतिनीधी आणि वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे, तसेच मुंबई सकाळ या वृत्तपत्रात मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. त्याच प्रमाणे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून आणि मी मराठी या वृत्त वाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी युवर स्टोरी या डिजिटल मीडियात वरिष्ठ कंटेट प्रोड्युसर म्हणूनही काम पाहिले आहे. सुनील तांबे हे २०१५ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये आजतागायत कार्यरत आहेत. सुनील तांबे यांना इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडियात गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख