अ‍ॅपशहर

सरकार, प्रशासन नाचतंय, विरोधकांनाही बोलवा

मुंबईतील नद्यांचे संवर्धन करण्याचं आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या व्हिडिओवरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे. 'हा एक व्यावसायिक व्हिडिओ असून त्यात मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी गाताना आणि ताल धरताना दिसत आहेत,' असं सांगतानाच 'असे व्हिडिओ काढून जर राज्याचे प्रश्न सुटणार असतील तर विरोधी पक्षांनाही बोलवा. त्यांना का बाजूला ठेवता? सरकार नाचतंय, प्रशासन नाचतंय मग विरोधकांनाही नाचायला बोलवा,' असा चिमटा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2018, 4:11 pm
मुंबई: मुंबईतील नद्यांचे संवर्धन करण्याचं आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या व्हिडिओवरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे. 'हा एक व्यावसायिक व्हिडिओ असून त्यात मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी गाताना आणि ताल धरताना दिसत आहेत,' असं सांगतानाच 'असे व्हिडिओ काढून जर राज्याचे प्रश्न सुटणार असतील तर विरोधी पक्षांनाही बोलवा. त्यांना का बाजूला ठेवता? सरकार नाचतंय, प्रशासन नाचतंय मग विरोधकांनाही नाचायला बोलवा,' असा चिमटा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin sawant on save mumbai rivers music video
सरकार, प्रशासन नाचतंय, विरोधकांनाही बोलवा


नद्या संवर्धनाच्या नावाखाली काढण्यात आलेल्या व्हिडिओवरून सचिन सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या व्हिडिओसाठी टी-सिरीज या कंपनीचीच का निवड केली? मुख्यमंत्र्यांचे आणि टी-सिरीजचे काही कौटुंबीक संबंध आहेत का? सरकारशी या कंपनीचे संबंध आहेत का? या व्हिडिओसाठी किती पैसे लागले? व्हिडिओतील गायकांना मानधन दिले आहे का? किती मानधन दिले आहे? असा सवाल सावंत यांनी केला.

असा व्हिडिओ काढल्यानं जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का? तसं वाटत असेल तर मग अन्य व्हिडिओही तयार करा. शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळ्या बांधण्याची वेळ आली आहे. त्यावरही व्हिडिओ काढणार आहात का? त्यात अधिकाऱ्यांना नाचायला आणि गायला सांगणार आहात का? या अधिकाऱ्यांना नाच-गाण्याचे क्लास लावणार आहात का? असे सवालही त्यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज