अ‍ॅपशहर

अॅनाबेल मेहता यांचा ब्रिटन सरकारकडून सन्मान

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सासूबाई व सामाजिक कार्यकर्त्या अॅनाबेल मेहता यांचा ब्रिटन सरकारने 'मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर' अर्थात एमबीई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Maharashtra Times 18 Jun 2017, 1:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin tendulkar mother in law activist annabel mehta awarded mbe by british govt
अॅनाबेल मेहता यांचा ब्रिटन सरकारकडून सन्मान


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सासूबाई व सामाजिक कार्यकर्त्या अॅनाबेल मेहता यांचा ब्रिटन सरकारने 'मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर' अर्थात एमबीई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अॅनाबेल यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार ब्रिटनमधील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक समजला जातो.

अॅनाबेल मेहता या 'अपनालय' स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक कार्य करत आहेत. मागील ४० वर्षांपासून कार्यरत आहेत. गोवंडीतील डम्पिंग ग्राउंडजवळ राहणाऱ्या गरिब नागरिकांसाठी, मुलांसाठी 'अपनालय'च्यावतीने आरोग्य, शिक्षण आदींबाबत विविध उपक्रम, कार्यक्रम राबवण्यात येतात. अॅनाबेल मेहता यांचा जन्म बर्मिंगहॅममध्ये झाला असून विवाहानंतर १९६६ साली भारतात पती आनंद मेहतांसह भारतात स्थायिक झाल्या आहेत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज