मुंबई : मुंबईत सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेला सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. मुंबई पोलिस (Mumbai Police) आयुक्त हेमंत नगराळे यांनी विशेषाधिकार वापरून हा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील हायप्रोफाइल भागात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे याचे नाव आले. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि याप्रकरणातही सचिन वाझे याच्याकडेच संशयाचं बोट गेलं. तसंच सचिन वाझे यानेच मनसुख हिरेन यांची हत्या केली आहे, असा दावा नंतरच्या काळात महाराष्ट्र एटीएसने केला.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आज मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी विशेषाधिकार वापरत सचिन वाझे याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.