अ‍ॅपशहर

साध्वी प्रज्ञाचा जामीन NIA कोर्टाने फेटाळला

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील संशयित आरोपी साध्वी हिच्याविरोधात ठोस पुरावा नसल्याचे सांगून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) क्लिन चीट दिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंहचा जामीन अर्ज एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज फेटाळून लावला. जामिनासाठी साध्वी प्रज्ञा सिंहला हाय कोर्टात दाद मागावी लागणार आहे.

Maharashtra Times 28 Jun 2016, 4:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sadhvi pragyas bail plea rejected by nia court
साध्वी प्रज्ञाचा जामीन NIA कोर्टाने फेटाळला

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील संशयित आरोपी साध्वी हिच्याविरोधात ठोस पुरावा नसल्याचे सांगून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) क्लिन चीट दिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंहचा जामीन अर्ज एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज फेटाळून लावला. जामिनासाठी साध्वी प्रज्ञा सिंहला हाय कोर्टात दाद मागावी लागणार आहे.

२००८ साली मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली. साध्वी विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा देत राष्ट्रीय तपास संस्थेने पुरवणी आरोपपत्रात साध्वीला क्लिन चीट दिली होती. एनआयकडून क्लिन चीट मिळाल्यानंतर साध्वी हिने एनआयएच्या विशेष कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता ती मोटारसायकल फरारी आरोपी रामचंद्र कालसंगराच्या ताब्यात होती. त्यामुळे या गुन्हाप्रकरणी साध्वीला जबाबदार धरले जावू शकत नाही, असा दावा जामीन अर्जात केला होता.

दरम्यान, अहमद सय्यद बिलाल या व्यावसायिकाने साध्वीच्या जामिनाला विरोध करीत कोर्टात अर्ज केला होता. दोन्ही बाजुकडील दावे-प्रतिदावे ऐकल्यानंतर एनआयए कोर्टाने साध्वींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज