अ‍ॅपशहर

'आर्ची' आंतरजातीय विवाह योजनेची अॅम्बेसेडर?

'सैराट' चित्रपटातून तरुणाईला याड लावणारी 'आर्ची' आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अॅम्बेसेडर होणार अशी चर्चा आहे. आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार रिंकू राजगुरूच्या नावाचा विचार करतंय. समाजिक न्याय विभाग यासंदर्भात लवकरच निर्णय घेईल, असं सांगितलं जातंय.

Maharashtra Times 12 May 2016, 1:42 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sairat actress rinku rajguru will be made inter caste marriage scheme brand ambassador
'आर्ची' आंतरजातीय विवाह योजनेची अॅम्बेसेडर?


'सैराट' चित्रपटातून तरुणाईला याड लावणारी 'आर्ची' आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अॅम्बेसेडर होणार अशी चर्चा आहे. आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार रिंकू राजगुरूच्या नावाचा विचार करतंय. समाजिक न्याय विभाग यासंदर्भात लवकरच निर्णय घेईल, असं सांगितलं जातंय. पण हा निर्णय राज्य सरकारला अडचणीत आणू शकतो.

आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावर सामाजिक न्याय विभागाची नुकतीच बैठक झाली. यात रिंकू राजगुरू आणि तिच्या पालकांना प्रस्ताव पाठवण्यावर चर्चा झाली. आता ब्रँड अॅम्बेसेडरचा हा प्रस्ताव रिंकू आणि तिचे कुटुंबीय स्वीकारतात का? असा प्रश्न आहे. दुसरीकडे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यास तो कायद्याच्या कचाट्यातही अडकू शकतो. कारण 'आर्ची'ची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू ही अपल्पयीन आहे. यामुळे तिला आंतरजातीय विवाह योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर करणं योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

आंतरजातीय विवाहसंदर्भात सामाजिक न्याय विभाग राज्यभर अभियान चालवणार आहे. तसंच आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना विवाहाची ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांना शैक्षणिक, आर्थिक लाभ देण्याचा विचार सामाजिक न्याय विभाग करत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज