अ‍ॅपशहर

मुंबई: 'फरसाण कारखाना आगीची चौकशी करणार'

साकीनाका भागातील भानू फारसाण कारखान्याच्या भीषण आगीच्या घटनेची चौकशी करण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2017, 10:15 pm
मुंबई: साकीनाका भागातील भानू फारसाण कारखान्यात लागलेल्या भीषण आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पाटील यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sakinaka farsan factory fire will be investigated says minister chandrakant patil in assembly
मुंबई: 'फरसाण कारखाना आगीची चौकशी करणार'


यासंदर्भात निवेदन करताना पाटील म्हणाले की, आज पहाटे साडे तीनच्या सुमारास भानू फरसाण कारखान्याला आग लागली. प्राथमिक माहितीनुसार सिलेंडरच्या स्फोटाने आग लागली असल्याचे निदर्शनास येत आहे. घटनास्थळावरून १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र त्यातील दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहितीही पाटील यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज