अ‍ॅपशहर

सालेमचा निकाहचा अर्ज फेटाळला

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व गँगस्टर अबू सालेमने एका महिलेशी निकाह करण्याची परवानगी मागणारा अर्ज टाडा न्यायालयापुढे केला होता.

Maharashtra Times 9 Sep 2017, 4:01 am
मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व गँगस्टर अबू सालेमने एका महिलेशी निकाह करण्याची परवानगी मागणारा अर्ज टाडा न्यायालयापुढे केला होता. तथापि खटल्याचा निकाल लागला असल्याने तो व्यर्थ असल्याचे सांगत न्यायालयाने तो फेटाळला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम salems marriage application rejected
सालेमचा निकाहचा अर्ज फेटाळला


टाडा न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे सुनावणी झाली. २०१५मध्ये सालेम व एका महिलेचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. सालेम पोलिसांसोबत रेल्वेने लखनौला जात असताना दूरध्वनीवर झालेल्या संभाषणाअंती त्याचा या महिलेशी निकाह झाल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला होता. आपल्याविषयी आलेल्या बातमीने बदनामी झाली असून, सालेमशीच निकाह करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे या ​महिलेचे म्हणणे होते. त्यामुळे या महिलेशी निकाह करण्याची परवानगी मागणारा अर्ज सालेमने टाडा न्यायालयापुढे केला होता. शिक्षेचा निकाल लागल्याने आता हा अर्ज निरूपयोगी असल्याचे स्पष्ट करीत न्या. सानप यांनी तो फेटाळून लावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज